शिरूर तालुका

शिक्रापुरात चक्क दुकानात शिरली भलीमोठी घोरपड

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड परिसरात असलेल्या एका दुकानात भर दिवसा भलीमोठी घोरपड शिरल्याने दुकानदाराची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र प्राणीमित्रांनी सदर घोरपडीला पकडल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास टाकला तर घोरपडीला देखील जीवदान मिळाले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या साई सुगंधालय दुकानात भर दुपारच्या सुमारास एक भलीमोठी घोरपड शिरली यावेळी दुकानातील ग्राहकांसह दुकानदाराची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान दुकान चालक प्रवीण भुजबळ यांनी इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना दिली असता शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत दुकानाची पाहणी करुन सदर घोरपडीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

यावेळी सध्या उन्हाच्या तीव्रतेने तसेच भक्षाच्या शोधात वन्यजीव मनुष्यवस्तीत येत असल्याचे इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी सांगितले, तर याबाबत ची माहिती शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील यांना देत घोरपडीला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago