क्राईम

करंदीच्या जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गौतम गायकवाड हे सकाळच्या सुमारास शाळेत आल्यानंतर शाळेत फेरफटका मारत असताना त्यांना स्टोअररुमच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने स्टोअर रुमची पाहणी केली असता शाळेतील कॉम्प्यूटर, हॉलीबॉल, लेझीम, माईक, फॅन यांसह आदी खेळाचे तसेच शैक्षणिक साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत शाळेचे मुख्द्याध्यापक गौतम शंकर गायकवाड (वय ५५) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

3 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago