शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उदघाटन

शिक्रापूर (शशेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे नागरिकांना कायद्याची, शासकीय नियमांची माहिती मिळावी तसेच शासकीय व खाजगी कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवता यावा यासाठी नुकतेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे पुजन करुन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी खेडकर, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, सतीश गायकवाड, नुतन शाखेचे अध्यक्ष किरण थोरात, उपाध्यक्ष किरण लांडगे, सचिव विशाल मराठे, सहसचिव विशाल चव्हाण, खजिनदार स्वप्निल चव्हाण, सहखजिनदार विजय विधाटे, सदस्य महेश चौधरी, शरद कुसाळकर, गणेश रणदिवे, अक्षय गायकवाड, आदित्य करपे, उपसरपंच तनुजा विधाटे, माजी उपसरपंच कविता चौधरी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष करपे, अर्जुन चव्हाण, सुभेदार रामचंद्र विधाटे, सुभेदार चंद्रकांत चव्हाण, सुभेदार ठकसेन पवार, दादाभाऊ काळे, सर्जेराव रणसिंग, काकासाहेब ढेरंगे, रोहिदास चौधरी, सचिन घावटे, किरण काळे, रवींद्र चव्हाण, रमेश विधाटे, अमोल चव्हाण, प्रमोद चव्हाण, राजकुमार चव्हाण, ओंकार विधाटे, तुषार विधाटे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी यशवंतराव चव्हाण आरटीआय संभाषण केंद्राचे प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांनी महिती अधिकार अधिनियम २००५ विषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कामांची माहिती मिळवणे हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे तर संबंधित व्यक्तीला ती माहिती देणे हा कायदा आहे. ठराविक कालावधीत योग्य माहिती न दिल्यास कर्तव्यावर असणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही होऊ शकते अशी माहिती उपस्थितांना दिली असून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी योग्य मार्गदर्शन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

38 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago