शिरूर तालुका

कासारीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी सह पडाळी वस्ती येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी सह पडाळी वस्ती येथील रस्त्यांवर खड्डे पडून पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत आहे. रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर अनेकदा दुचाक्या घसरुन लहान मोठे अपघात झाल्याच्या देखील घटना वारंवार घडत आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा रस्त्यामध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे.

ग्रामपंचायतकडे सध्या निधी शिल्लक नाही; वसंत पवार

कासारी ग्रामपंचायत कडे सध्या रस्त्यांवर मुरुमिकरण करण्यासाठी निधी शिल्लक नसून काहीतरी उपाययोजना करुन निधी उपलब्ध करुन रस्त्यावर मुरुमिकरण केले जाईल, असे ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago