शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेच्या श्री. भैरवनाथ माध्य, उच्च माध्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग करडे शाखेतील हिंदी विषयाच्या व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका शारदा मिसाळ यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने (दि. १) नोव्हेंबंर रोजी नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी डॉ. मंचला कुमारी झा.(केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय, हिंदी विभाग केंद्रीय विश्वविद्यालय, काठमांडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी राजेश कुमार(संशोधन केंद्र डी.आर.डी चे वैज्ञानिक), आसावरी बापट(निदेशक भारतीय दूतावास) ओम प्रकिशजी (बाल साहित्यकार) डॉ. तुलशी दिवस (टोकियो विश्वविद्यालय) प्रकाश ढगे( साहित्यिक, संपादक) संयोजक प्रमुख कैलास जाधव, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी, प्राचार्य सोळसे सर, प्राचार्य. रमेश मचाले, राजेंद्र मिसाळ (उपाध्यक्ष पु.जि.शि.मंडळ,पुणे सेवक सह.पतसंस्था, पुणे) इत्यादी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील ७० व नेपाळ मधील १६ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या संमेलनात भारत, नेपाळ संंस्क्रुतीतील सारखेपणा, भाषा विकास यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच कविता सादरीकरण करण्यात आल्या. पुस्तके प्रकाशने करण्यात आली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारसाहेब उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे साहेब, मानद सचिव अँड. संदिप कदम साहेब, उपसचिव एल.एम पवार साहेब, सह सचिव जाधव साहेब, खजिनदार अँड. मोहनराव देशमुख साहेब ई. शारदा मिसाळ यांचे अभिनंदन केले.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…