शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील जांबुत येथील तिसरा बिबट्या जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. हल्ल्याच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील सहा ते सात वर्षे वयोमान असणारा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे.

शिरुर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळा येथे सुदाम जोरी यांच्या वस्तीवर वनविभागाने सावज असलेला पिंजरा लावला होता. बिबट्याच्या हल्ल्यात सचिन जोरी,पुजा नरवडे यांंना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून वनविभागाकडून जांबुत परिसरात बिबट्यांंना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जोरी मळा येथे पिंजऱ्यात अडकलेला हा तिसरा बिबट्या आहे.

जांबुत परिसरात वनविभागाने आठरा पिंजरे लावलेले आहेत. तर 20 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. त्यामध्ये दोन ठिकाणी बिबट्याचे फोटो मिळाले आहेत. बिबट्याचा वावर, पाऊलखुणा द्वारे पिंजऱा लावण्यात येतो. जोरीमळा येथील कॅमेरा ट्रॅप मध्ये बिबट्या कैद झाला होता. त्यानुसार त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यांत बिबट्या अडकला. या बिबट्याची माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago