मलठण (सुनिल जिते): आमदाबाद गावाजवळ मलठण -आमदाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे.
(दि. १७) सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३. ३० वाजता आमदाबाद-मलठण रोडवर हॉटेल विश्व जवळ हा अपघात घडला. पिकअप (क्र. MH-42-AQ-5486 ) वरून जाणारा चालक सुनील कोंडीबा देवकाते(रा. , लोणारवाडी ,ता. दौंड जि. पुणे) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित समोरून येणाऱ्या परेमेश्वर माणिक माळी (वय ३०, रा. रामलिंग ता. शिरूर) यांच्या मोटारसायकलला (क्र. MH-12/JL-2155) जबर धडक दिली.
या अपघातात परेमेश्वर माळी यांना हातापायासह पोटावर गंभीर दुखापत झाली. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर आरोपी सुनिल देवकाते घटनास्थळावरून फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या अपघाताची फिर्याद शिरूर पोलिस ठाण्यात दि. १७ सप्टेबर रोजी मृतकाचा वडील माणिक माळी यांनी खबर दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पो. हवा. आगलावे हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…