शिरूर तालुका

मलठणच्या सावी ताठेचे राष्ट्रीय स्तरावर यश! सेबर तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदकाची कमाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या मिनी आणि सातव्या चाइल्ड नॅशनल फेन्सिंग चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथील सावी संतोष ताठे हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदक पटकावले.

सावीने दहा वर्षाखालील सेबर प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना देशभरातील एकूण ३२ स्पर्धकांमध्ये आठव्या क्रमांकावर आपले स्थान पटकावले. या उत्तम खेळीसह तिने राष्ट्रीय स्पर्धेत राज्यासाठी पदक मिळवण्याचा मान मिळवला आहे.तिच्या या यशामध्ये काजी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्याने सराव, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षणामुळे सावीने ही कामगिरी साध्य केली.

सावीच्या या यशामुळे शाळा, शिक्षकवृंद, गावकरी आणि तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. बालवयात मिळालेले हे यश तिच्या भावी कारकिर्दीस निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत विविध ठिकाणांहून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago