ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते.
शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अ) अध्यक्ष- सामाजिक कार्याचा ५ वर्षाचा अनुभव असलेली महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेली माहिला.
ब) दोन सदस्य- महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशा अशासकीय संघटना / संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती, त्यांच्या पैकी किमान एक सदस्य महिला असावी.
1) त्यापैकी कायद्याची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती.
2) तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्प संख्यांक समाजातील महिला.
अर्जदार ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असावा तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अपहार / गुन्हा दाखल नसावा, अर्जदार यांचे अलीकडील काळातील पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र, वैयक्तिक परिचय पत्र व इतर आवश्यक कागदपत्रासह अध्यक्ष व सदस्यांसाठी परिपूर्ण प्रस्ताव दि.२९ जुलै २०२५ रोजी पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नियोजन भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…