शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सनसवाडी (ता. शिरुर) येथे पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा तिघा युवकांनी पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रितेश लिओ सदाफुले, शक्तिमान माणिक आडे, कृष्णा सुहास मीरेवाड या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत जात असताना तसेच क्लास वरुन घरी जात असताना प्रितेश सदाफुले, शक्तिमान आडे, कृष्णा मीरेवाड हे तिघे 10 दिवसांपासून मुलीचा पाठलाग करत होते. त्यानंतर त्यांनी मुलीला थांबवून तिचा मोबाईल नंबर मागत मुलीचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

त्यानंतर मुलीने घरी जाऊन घडत असलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला असता तिच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रितेश लिओ सदाफुले, शक्तिमान माणिक आडे, कृष्णा सुहास मीरेवाड तिघे रा. कवठेमळा सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या तिघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

6 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

6 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

6 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago