महाराष्ट्र

झेडपीच्या शाळा भरण्याच्या वेळा बदलणार

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो.

उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांत शाळांची वेळ सकाळीच असते. यंदा १ मार्चऐवजी ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरु होणार आहेत. पण, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देतील. त्यानंतर तेच सोमवारी (ता. २७) त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा प्रथमच सर्व शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. परंतु, जून-जुलैमध्ये होणाऱ्या बदल्या फेब्रुवारी संपला तरीदेखील पूर्ण झालेल्या नाहीत. आता पुढील आठवड्यात त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल, पण त्यांना नवीन शाळेवर कधीपासून रुजू व्हावे लागेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरु होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago