शिरूर तालुका

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) नजिक पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कार्यक्रमा संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब साळुंके यांध विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्याच्या आयोजन साठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरुपी समिती गठीत करण्यात आली आहे. अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी तसेच सुविधा निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अल्पकालिन व दीर्घकालिन नियोजन करण्यात येत आहे.

सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्या येईल. तसेच या वर्षी अधिक संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असल्याने वाहनतळाची संख्या वाढविण्यात येणार आहे. पाण्याच्या टँकर ची संख्या वाढविण्यात येणार असून यावर्षी १५० टँकर, १ हजार ५०० फिरती शौचालये, पीएमपीएमएलच्या ३६० बसेस, ३० रुग्णवाहिका, दुचाकी आरोग्य पथके, अग्निशमन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

समाज बांधवांच्या आरोग्य सुविधेसाठी १४० वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि ५ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. परिसरातील खाजगी रुग्णालयांना खाटा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाला सोहळ्याच्या वेळी परिसरातील वाहतूक वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सह्याद्री वाहिनीवररुन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ. देशमुख यांनी दिली. तसेच यावेळी कार्यक्रमाचे नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील.

आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा व्हावा यासाठी पोलीस नागरिकांशी समन्वय ठेऊन काम करेल आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या असून आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

11 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

18 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago