क्राईम

महिलेला धाक दाखवत सशस्त्र दरोडेखोरांकडून बंगल्यावर दरोडा

३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास, बंगल्याच्या पूजेनंतर दोनच दिवसात दरोड्याच्या घटनेने खळबळ

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने एका बंगल्यावर दरोडा टाकत महिलेला धाक दाखवत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल 3 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सहा अज्ञात दरोडे खोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सिमा येळवंडे यांच्या बंगल्याची पूजा नुकतीच १९ डिसेंबर रोजी झालेली आहे. आज पहाटेच्या सुमारास सिमा यांचे पती शेतातील कामांसाठी मजूर आणण्यासाठी गेले असता सिमा यांनी बंगल्याचा दरवाजा बंद केला काही काही वेळात अचानक सर्व लाईट बंद होत दरवाजाचा टकटक आवाज आल्याने सिमा यांनी कोण आहे विचारले.

मात्र काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घाबरुन पतीला फोन करत घडलेला प्रकार सांगितला. काही वेळात दरवाजाची कडी तोडून चार युवक घरात आले त्यांनी सिमा यांना गजाचा धाक दाखवून कोपऱ्यात बसवून पैसा अडका कोठे आहे, असे म्हणत कपाटाचा दरवाजा तोडून कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ टाकून देत रोख दोन लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिने काढून घेतले.

दरम्यान अजून पैसे कोठे आहेत डे नाहीतर मारुन टाकीन अशी धमकी देत सदर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील झुमके काढून घेतले. याचवेळी बाहेर उभ्या असलेल्या दोघांनी गाडी येत आहे बाहेर या असा आवाज दिल्याने घरातील चौघे सिमा यांचा मोबाईल फरशीवर फोडून बाहेर पळू लागले त्याच वेळी सिमा या त्यांच्या मागे पळाल्या त्याचवेळी सिमा यांचे पती 3 मजुरांसह घरासमोर आले. मात्र 6 दरोडेखोर पळून शेतातून पळून जात असताना त्यांचा काही अंतर पाठलाग केला मात्र दरोडेखोर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, गणेश सुतार, विशाल देशमुख यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या घडलेल्या प्रकाराबाबत सिमा विलास येळवंडे (वय ३५) रा. धुमाळ मळा मुखई (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 6 युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.

पूजेनंतर दोनच दिवसात दरोड्याने खळबळ…

सिमा येळवंडे यांच्या बंगल्याची (दि. १९) डिसेंबर रोजी दोनच दिवसांपूर्वी पूजा झालेली असतानाअ आणि शेतातील मालाचे ८० हजार रुपये (दि. २०) डिसेंबर रोजी घरात आणून ठेवलेले असताना सदर दरोड्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

1 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

1 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

3 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago