शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वाव्हळ व पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर, विश्वस्त बाबुराव साकोरे, विश्वस्त अक्षय गायकवाड, प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या उज्वला दौंडकर, क्रीडाशिक्षक विशाल गुजर यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी विविध क्रीडा प्रकार संपन्न झाले, तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वाव्हळ व पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका नीता शीलवंत यांनी केले तर बाबुराव साकोरे यांनी आभार मानले.
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…