शिरूर तालुका

शिरुर शहर तसेच तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) तालुका महिला कार्यकारणी जाहीर

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर शहर तसेच तालुक्यातील महिला कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते यावेळी सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी डॉ स्मिता कवाद, उपाध्यक्षपदी तृप्ती जोशी, शितल शर्मा, राणी शिंदे, छाया हारदे, मोहिनी मांढरे, सरचिटणीसपदी जयश्री थेऊरकर, सरचिटणीसपदी दिपाली आंबरे, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘युवती अध्यक्षपदी, गीताराणी आढाव, कार्याध्यक्षपदी सोनल जोशी, उपाध्यक्षपदी अपर्णा देव्हाडे यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विश्वास ढमढरे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, शिरुर तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा विद्या भुजबळ, शिरुर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषार दसगुडे, शिरुर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रशांत पवार, रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, संगिता शेवाळे, कार्याध्यक्ष हाफिज बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे शिरुर तालुका अध्यक्ष राजुद्दीन सय्यद, पुणे जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहील शेख, सागर नरवडे, अमित शिर्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

6 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago