मुख्य बातम्या

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

पुणे : पुणे-नगर आणि पुणे-नाशिक या दोन महामार्गांवरील कोंडी दूर करण्यासाठी या महामार्गांच्या विस्तारासह येथे उन्नत मार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निर्णय घेतला आहे. पुणे-शिरूर दरम्यानचा सहापदरी महामार्ग आणि त्यावर सहा पदरी उड्डाणपूल; तसेच नाशिक फाटा ते खेड दरम्यान दोन पदरी सेवा रस्त्यांसह आठ पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गांसाठी तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित दुमजली उड्डाणपूल वाघोलीऐवजी आता रामवाडीपर्यंत करण्यात येणार आहे. पुणे शहरातील शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि समतल विलगक (ग्रेड सेप्रेटर) उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येरवड्यापासून वाघोलीपर्यंतचा प्रवास वेगवान होणार आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि हा रस्ता वाहतूक नियंत्रक दिवेमुक्त करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी ही बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आला आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून शिरूर ते वाघोली असा दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हा उड्डाणपूल विमाननगर-रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प आराखडा करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आली. शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, अशी सूचना पवार यांनी केली.

दरम्यान, पुणे-नगर महामार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे या महामार्गांना समांतर असे उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच केली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील या दोन्ही महामार्गांच्या उन्नत मार्गांच्या बांधकामासाठीच्या निविदा एनएचएआयने प्रकाशित केल्या आहेत. पुणे-शिरूर मार्गासाठी साडेसात हजार कोटी रुपये, तर नाशिक फाटा-खेड मार्गासाठी सहा हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पुणे-शिरूर महामार्ग…
पुणे ते शिरूर महामार्गाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. शहराच्या हद्दीपासूनच शिरूरपर्यंतचा हा मार्ग जमिनीलगत सहा पदरी आणि त्यावर उन्नत स्वरूपात सहा पदरी अशा स्वरूपाचा बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे ते शिरूर दरम्यान उन्नत मार्गाचे बांधकाम करताना सुरुवातीच्या टप्प्यात सध्याच्या अस्तित्वातील मेट्रोच्या विस्ताराच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या दोन महामार्गांप्रमाणेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार असून, त्याशिवाय या रस्त्यावरही चार पदरी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. या ५५ किमीच्या मार्गासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दहा किलोमीटर वाहतूककोंडी

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

7 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

19 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

20 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago