शिरूर तालुका

निर्वीत मुग पिक प्रात्यक्षिकाची शास्त्रज्ञांनी केली पाहणी…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगाम व रब्बी हंगामात उत्पादकता वाढीसाठी पिक प्रात्यक्षिक राबविले जाते. या ही वर्षी खरीप हंगामात निर्वी गावची मुग पिक प्रात्यक्षिकाची निवड केली असुन 25 शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देण्यात आला आहे या प्रात्यक्षिकात बियाणे स्वतः शेतकऱ्यांनी वापरले असून उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया साठी किड व रोग नियंत्रणासाठी विविध निविष्टा देण्यात आल्या असुन पिक प्रात्यक्षिक लाभातील शहाजी शेळके यांनी पिक स्पर्धत सहभाग ही घेतला आहे.

कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथील डॉ दत्तात्रय गावडे यांनी पिक प्रात्यक्षिकास भेठ देऊन पाहणी करुन मार्गदर्शन केले आहे. तसेच कांदा रोपे टाकताना बीज प्रक्रिया करण्याबाबत ही आवाहन केले पिक प्रात्यक्षिकास तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे, कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, सरपंच शोभा तरटे ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, निलेश सोनवणे, शहाजी शेळके यांनी पिक स्पर्धत भाग घेतल्याने प्रक्षेत्रास भेटी दिल्या आहेत पिक प्रात्यक्षिकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना कृषी सहायक जयवंत भगत यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास विजय रोडे, माजी सरपंच सुनिता सोनवणे, विठ्ठल भगत, लतेश भगत कृषी सहायक संतोष फलके मोनिका झगडे उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago