शिरूर तालुका

ग्राहक सप्ताहानिमित्त मलठण येथे विविध विषयांवर मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय शिरूर आणि ग्राहक पंचायत संस्था, पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ग्राहक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहक सप्ताहातील दुसरे पुष्प शुक्रवार (दि. १९) रोजी सकाळी ११ वाजता रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, मलठण येथे उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी आणि कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

वनरक्षक सविता चव्हाण यांनी बिबट्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर व उपयुक्त माहिती दिली. शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या वापरातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना उदाहरणांसह स्पष्ट करत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

दुय्यम निबंधक ए. व्ही. जाधव यांनी शेतकऱ्यांनी परस्पर संमतीने करावयाची वाटणीपत्रे, मृत्युपत्र तसेच खात्यांबाबतचे कायदेशीर मुद्दे सविस्तरपणे समजावून सांगितले. पुरवठा निरीक्षण अधिकारी सदाशिव व्हनमाने व पुरवठा निरीक्षक दिपक केदार यांनी नागरिकांनी रेशन कार्ड ऑनलाइन करून महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी कृषी विभागाने नुकतेच सुरू केलेल्या ‘महाविस्तार’ ॲपची माहिती देत शेतकऱ्यांनी त्याचा शेतीत प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी महेश डोके यांनी नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय वाढविण्याची गरज व्यक्त केली. पुढील काळात विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांच्या भेटी घडवून प्रशासकीय कामकाजाची माहिती देणे व प्रशासनाविषयीची भीती दूर करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक पंचायतचे राज्याध्यक्ष अशोकराव भोरडे यांनी केले, तर आभार राज्य सचिव बाबासाहेब थिटे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील ग्राहक पंचायत संस्था, पुणे जिल्हा यांच्या पदाधिकारी व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आसवले मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago