पिंपरखेड बीटमध्ये आतापर्यंत २७ बिबटे पकडण्यात वन विभागाला यश
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील टेमकरवाडी , तामखरवाडी, शिनगरवाडी आणि गावठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २१) रात्री चार वर्षांची बिबट मादी जेरबंद झाली.
पिंपरखेड बीट अंतर्गत आतापर्यंत एकूण २७ बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. सध्या शिरूरच्या बेट भागात ऊसतोडणीचा हंगाम सुरू असून ऊसाची शेते मोकळी होत असल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
टाकळी हाजी येथील नामदेव लोखंडे यांच्या शेतात वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून पिंजरा लावला होता. रविवारी रात्री सुमारे दहा वाजता शिकारीच्या शोधात आलेली बिबट मादी या पिंजऱ्यात अडकली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे महेंद्र दाते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही बिबट मादी चार वर्षांची असून तिला तातडीने जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले, अशी माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली.
या परिसरात बिबटे समूहाने फिरताना अनेक शेतकऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले आहे. काही वेळा ते एकमेकांना जोरजोरात आवाज देताना ऐकू येतात. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुरेश लोखंडे यांनी घराजवळ असे आवाज ऐकले आणि त्यानंतर काही वेळाने पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला.
परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…