शिरूर तालुका

पुणे नगर महामार्गावरील अपघात रोखण्यास उपाययोजना करा

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनास निर्देश

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

पुणे अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या रस्त्याची क्षमता ४० हजार वाहने इतकी असताना प्रत्यक्षात ७५ हजार वाहने दररोज धावतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना महामार्गाची पाहणी करण्याचे निर्देश दिले असता सदर पाहणीनंतर उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश देखील त्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार वाघेश्वर पार्किंग येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल बसविणे, वाघेश्वर मंदिर ते वाहनतळ चौक दरम्यान रस्ते दुभाजकांना रंग लावणे, रिफ्लेक्टर, कॅटआय, रेलींग बसवणे, रस्त्यांवर पट्‌टे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पदपथापरील अतिक्रमणे हटवणे, अनाधिकृत फेरीवाले, टपरीवाले, फळविक्रेत्यांना मज्जाव करावा, वाघोली चौकात प्रवासी बसेसना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव करुन त्यांना बसथांबा उपलब्ध करुन द्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. बीजेएस चौक, वन स्टॉप फर्निचर मॉल, सोमेश्वर पार्क फ्लॅश आपले घर, आय व्ही इस्टेट, केसनंद फाटा येथे विकफिल्ड कंपनी व जगताप डेअरी येथील महामार्गाचे वळण व उतार, केसनंद फाटा चौक, थेऊर फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी चौक, शिक्रापूर, चाकण चौक, वेळ नदीवरील पूल, कोंढापुरी, रांजणगाव गणपती मंदीर, राजमुद्रा चौक, यश ईन चौक, शिरुर बायपास चौक आदी ठिकाणी विविध उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच पदपथावरील, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, आवश्यक तेथे सिग्नल्स बसविणे, दिशादर्शक फलक व नो पार्किंग सूचनाफलक बसवणे, दुभाजकांची दुरुस्ती, अनावश्यक छेद दुभाजक बंद करणे, ब्लिंकर्स, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रंबलर्स बसविणे, पादचाऱ्यांसाठी रस्ता क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करणे, गतिरोधक बसविणे, उच्च प्रकाशव्यवस्थेसाठी दिवे बसविणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग, महावितरण, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, एमआयडीसी, संबंधित ग्रामपंचायती आदी सर्वांनाच याअनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.

अपघातमुक्त महामार्गासाठी नागरिकांच्या सूचनांचे स्वागत…

पुणे नगर महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचाही गांभिर्याने विचार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी आपल्या सूचना rto.12-mh@gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago