शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथील एका सदनिकेच्या दरवाजाचा कडी कोयंडा दिवसाढवळ्या तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील अमृत कल्लश सोसायटीत राहणाऱ्या कविता मावळे या सतरा मे रोजी सकळच्या सुमारास कामाच्या निमित्ताने दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेलेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मावळे या घरी आल्या असताना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला तसेच घरातील कपाट उघडे दिसले. त्यामुळे पाहणी केली असता कपाटातील 50 हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे काही दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत कविता अभिलाश मावळे (वय ३०) रा. अमृत कल्लश सोसायटी मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. समतानगर साईबाबा मंदिर जवळ जळगाव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…