पुणे: येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राज रावसाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव असुन या संदर्भात महाविधी लाँ स्टुडंटन्स असोसिएशन या विधी शाखेतील विद्यार्थ्यांकरिता काम करण्याऱ्या सामाजिक संस्थेकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
राज हा मूळचा बीड जिल्ह्यातील पाटसरा या गावचा सामान्य शेतकरी कुटुंबातील असून तो पुण्यात विधी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. अनेक सामाजिक उपक्रमात अग्रभागी राहून नियोजनात राजचा सक्रिय सहभाग होता. दि 9 मे 2023 रोजी राज राहत असलेल्या गोखले नगर भागातील विद्यार्थी सहाय्यक समिती या होस्टेल मध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज सारख्या विद्यार्थ्यांने असे टोकाचे पाऊल उचलावे ही मनाला पटणारी गोष्ट नाही. या मागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असले पाहिजे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे मुलाचे वडील रावसाहेब गर्जे यांनी फिर्याद दाखल केली आहे. तरीसुद्धा देखील अजून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
राज याने मृत्यूपुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निरुपम जयंत जोशी या विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. या विद्यार्थ्याला उसने पैसे देताना राजने मध्यस्थी केली होती. परंतु पुन्हा पैसे मागितल्यावर निरुपमने वारंवार नकार दिला. त्याने राजला पैसे न देता मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळून राजने आत्महत्या केली असल्याची शक्यता असुन या घटनेला 10 दिवस उलटूनही निरुपमला अटक झालेली नाही. निरुपमचे वडील जयंत जोशी हे देखील ज्येष्ठ वकील आहेत. त्यामुळे आरोपी अधिक काळ बाहेर राहिले तर पुरावे नष्ट करण्याचे आणि राजच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याचे प्रकार घडू शकतात.
त्यामुळे या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असुन अजून काही विद्यार्थ्यांची नावे या प्रकरणात येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी विविध स्तरावरून दबाब आल्याची आणि पैशाचा वापर केला गेल्याची सगळीकडे दबक्या आवाजात विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. याबाबत महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव अॅड प्रविण कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाला आपण यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन राजला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत निवेदन दिले आहे.
सदर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आम्हांला पोलीस स्टेशनसमोर संस्थेमार्फत आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावर पोलिस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यावेळी मालसा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नासिर पाटील आणि उपाध्यक्ष लखन दराडे उपस्थित होते.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…