शिरूर तालुका

शिरुर एस टी आगारातील महिला प्रसाधनगृहाची दुरावस्था; रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर येथील नवीन एस टी आगारात महिला प्रसाधान गृहाची मोठया प्रमाणात दुरावस्था झालेलीअसल्याबाबत अनेक महिला प्रवाशांनी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या. त्या महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतः शिरुर येथील एस टी आगारातील महिलांसाठी प्रसाधनगृह येथे पाहणी केली असता. तिथे मोठया प्रमाणात अस्वच्छता आढळून आल्याने रामलिंग महिला ऊन्नतीच्या वतीने याबाबत आवाज उठवत निवेदन देण्यात आले.

शिरुर येथील एस टी आगारातील महिलांच्या प्रसाधानगृहात मोठया प्रमाणात गुटका खाऊन थुंकलेल्या लाल रंगाच्या अस्वच्छ भिंती, अनेक प्रसाधन गृहाला कुलूप लावलेले, तुटलेल्या खिडक्या तर एका प्रसाधनगृह मध्ये सर्व कचरा टाकलेला आढळून आला. तसेच सर्वत्र अस्वच्छता असल्याचेही दिसून आले. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

तसेच एस टी आगारात स्वच्छतागृह वापरण्याचे दर 5 रु, स्नानगृह 7 रु असा फलकही तिथे दिसुन आला. एकीकडे भारतीय कायद्याच्या 1867 च्या कलम 7/2 नुसार महिलांना पेट्रोलपंप, हॉटेल, बसस्थानक याठिकाणी प्रसाधन गृहाचा मोफत वापरण्याचा अधिकार दिला असुनही काही ठिकाणी याची अंमबजावणी झालेली दिसून येते. तर काही ठिकाणी महिलांकडून 5 रु घेतले जातात. हा सर्व गैरप्रकार थांबवावा तसेच महिलांच्या प्रसाधनगृहाची स्वच्छता नियमित करण्यात यावी. महिलांसाठी मोफत सुविधेचा फलक प्रसाधनगृहा बाहेर लावण्यात यावा असे निवेदन रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने एस टी आगाराच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

तसेच निवेदन देऊनही महिलांच्या प्रसाधन गृहाची स्वच्छता न झाल्यास रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने एस टी बसस्थानकावर आंदोलन करु असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन शिरुर बसस्थानक येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उत्तम गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, गीता आढाव, दिपाली आंबरे,डॉ वैशाली साखरे, रुपाली बोर्डे, पल्लवी चाबुकस्वार, पल्लवी जगताप आदी महिला उपस्थित होत्या.

 

तसेच शिरुर येथील एस टी आगारातील महिला प्रसाधन गृहात कोणत्याही शाळेतील युवती अथवा प्रवासी महिला यांना कोणीही पैसे मागितले तर 8329044177 या नंबर वर कॉल करा असे आवाहन राणी कर्डीले यांनी केले आहे.

रामलिंग महिला उन्नती आणि रामलिंग महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभ

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago