राजकीय

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे.

मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, ‘शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असे असले तरीसुद्धा ते कधीपण अजित पवार गटात येऊ शकतात. जिथे विद्यमान चार खासदार आमच्या पक्षाचे आहेत, त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत. यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जागांसह 9 जागांवर अजित पवार गटाचा दावा आहे. शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांचा चेहरा मोठा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नाही.’

दरम्यान, लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यात प्रत्येक पक्षाने आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रक्षप्रवेशांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार, खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठ-मोठे दावे केले जात आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना ठाकरे यांचा मोठा धक्का…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

7 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

19 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

20 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago