शिक्रापूरातील व्यापाऱ्यांचा विद्युत वितरण अधिकाऱ्याला घेराव
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याची मागणी करत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील स्टेट बँक परिसरात वीज पुरवठा करणारे रोहित्र आठ दिवसांअसून जळलेले असल्याने परिसरात वीज नाही. त्याचा परिणाम शालेय मुलांच्या अभ्यास व व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे वारंवार मागणी करुन देखील विद्युत वितरण विभाग रोहित्र दुरुस्त करत नसल्याने काही व्यापारी व ग्रामस्थांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ओंकार हिरवे, ऋषिकेश तकटे, रविराज शिंदे, कमलाकर कुलकर्णी, यशवंत टाकळकर, प्रवीण काळोखे, किशोर देवासी, विलास थिटे, किशोर झुंजारे, विकास ससाणे, गोरख कळमकर, राजेंद्र करंजे यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करु, असा इशारा दिला असून विद्युत वितरण विभागाने आमची दखल न घेतल्यास आम्ही कार्यालयासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे यावेळी ओंकार हिरवे यांनी सांगितले.
सदर रोहित्र दहा वर्षात प्रथमच नादुरुस्त झालेले असून त्या बाबतचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे. मात्र रोहित्र शिल्लक नसल्याने वेळ लागला असून लवकरात लवकर विद्युत रोहित्र बसवले जाईल असे सहाय्यक अभियंता अशोक पाटील यांनी सांगितले.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…