शिरूर तालुका

शिक्रापूर पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीत आवाहन फलके

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरु केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक, तळेगाव ढमढेरे यांसह आदी ठिकाणी औद्योगिक वसाहतीत काही युवकांकडून ठेक्यासाठी कंपन्यांना त्रास देणे, खंडणी मागणे यांसारख्या घटना घडत असल्याने निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत आवाहनाचे फलक लावत त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक टाकलेले आहेत.

कंपन्यांना वेगवेगळ्या ठेक्यासाठी कोणी धमकावत असल्यास, त्रास देत असल्यास, माथाडी संघटना अन्य संघटना जबरदस्ती करत असल्यास, कोणी दहशत करत असल्यास, खंडणी मागत असल्यास, अडवणूक करत असल्यास तसेच माथाडी कामगार कामावर न ठेवता पैशाची मागणी करत असल्यास तसेच कोणीही आर्थिक पिळवणूक करत असल्यास पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी अन्यथा आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावे, असे आवाहन केल्याबाबतचे फलक लावलेले असल्याने पोलीस स्टेशन हद्दीतील कंपन्यांना मोठा आधार मिळाला असून औद्योगिक वसाहतीमध्ये दादागिरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

8 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

9 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

9 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

9 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

9 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

20 तास ago