पंतप्रधान नरेद्र मोदींकडून शिक्रापूरच्या नितीन खेडकरला शुभेच्छा
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवक डॉ. नितीन खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रामीण भागातील युवकांकडे देखील लक्ष असल्याचे दिसत असताना सध्या नरेंद्र मोदींच्या पत्रामुळे शिरुर तालुक्यातील युवकांमध्ये उत्साह निर्माण झाले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील उच्चशिक्षित युवक डॉ. नितीन खेडकर यांनी यापूर्वी भारत सरकारच्या खते व रसायन मंत्रालयचे संचालक म्हणून काम पाहिले असून त्यांचा दिल्लीशी चांगला संबंध निर्माण झालेला आहे. युवकांमध्ये असलेली चिकाटी नितीन खेडकर यांच्या मध्ये असून अनेक युवकांना व्यवसायामध्ये पाठबळ व प्रेरणा देण्यामध्ये नितीन खेडकर यांचा मोलाचा वाटा आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. नितीन खेडकर यांना पत्र पाठवत नववर्षाच्या शुभेच्छा देऊ केल्या असून दिलेल्या पत्रात गेल्या वर्षभरातील आठवणी व आव्हाने यांच्यापासून धडा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी पुढे जावे लागेल, तर राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम या भावनेने तुमचे प्रयत्न आपल्या राष्ट्राची व समाजाची प्रगती करतील असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले सदर पत्र शिक्रापूर सह शिरुर तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…