शिरूर तालुका

रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे प्रथमच कामगार दिनानिमित्त मंदिरातल्या सर्व कामगारांचा सन्मान

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असुन सोमवार (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त प्रथमच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या संकल्पनेतून तसेच देवस्थान ट्रस्टचे खजिनदार विजय देव यांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

सोमवार (दि 1) मे रोजी कामगार दिनानिमित्त देवस्थान ट्रस्ट मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सर्व सेवेकऱ्यांना फेटे बांधून श्रीफळ, गुलाबाचे फुल तसेच एक आकर्षक भेटवस्तू देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देऊन या पुढील काळात सर्वांनी भाविकांच्या सेवेसाठी एकजुटीने व एकत्रितपणे काम करून श्री महागणपती देवस्थानचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले. तसेच देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके यांनी तर व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी आभार मानले.

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर, देवस्थानचे कर्मचारी, सिक्युरिटी कर्मचारी, साफ – सफाई कर्मचारी तसेच अन्नछञ कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

11 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

17 तास ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

2 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago