शिरुर (अरुणकुमार मोटे): बेट भागात बिबटयाच्या हल्ल्यानंतर आता कोल्हयानेही शेतकऱ्यांवर हल्ला चढवला असून तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आलीआहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तामखरवाडीचे शेतकरी दशरथ मारुती मुंजाळ (वय ७०) , पूजा विनोद कळकुंबे (वय २५), सुरेश मारुती चोरे (वय ४०) या 3 व्यक्तींवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी चार ते पाच च्या दरम्यान हल्ला झाला आहे. हा कोल्हा पिसाळलेला असावा असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पूजा कळकुंबे ही कांद्याच्या शेतात कांदे काढत असताना अचानक कोल्हयाने पूजा हिच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला, तिथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा करताच कोल्ह्याने धूम ठोकली. त्यानंतर काही वेळातच दशरथ मुंजाळ हे शेतात गवत कापत असताना त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पुन्हा तासाभरात सुरेश चोरे यांच्या पायाला चावा घेतला. यापैकी दोघांनी टाकळी हाजी येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे उपचार करून सर्वांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे पाठविण्यात आले आहे. हे सगळे हल्ले साधारणपणे एक ते दिड किलोमीटर अंतरात झाले आहेत. घटनेची माहिती समजताच माजी सरपंच दामुशेठ घोडे, सरपंच अरूणाताई घोडे, सोसायटीचे संचालक संतोष गावडे यांनी रुग्णालयात जावून रुग्णांची भेट घेतली आहे.
कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी विशेष टास्क फोर्स पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःची,लहान मुलांची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी.
मनोहर म्हसेकर , वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…