रावडेवाडी येथिल घटना
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रावडेवाडी परिसरात एका मेंढपाळावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना 18 मे रोजी रात्री 10.30 वाजता घडली असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोमनाथ रघुनाथ रुपणेर (वय 35) व्यवसाय शेती व मेंढपाळ, रा. कान्हूर मेसाई, गारकुलवाडी, (ता. शिरूर) हे आपल्या कुटुंबासमवेत मेंढ्यांच्या वाघूरीजवळ झोपले असताना, आरोपी अमोल उर्फ युवराज लक्ष्मण तांबे (रा. रावडेवाडी) याने त्यांच्या वाघूरीतून एक कोकरू उचलून नेले. याबाबत विचारणा केली असता, आरोपीने संतापून सोमनाथ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
हल्ला करताना सोमनाथ यांनी डाव्या हाताने बचाव केला असता त्यांना कोपराजवळ, पोटरीला आणि तळहाताला गंभीर जखम झाली. नंतर आरोपीने पुन्हा हल्ला करताना त्यांच्या कपाळालाही इजा केली. दरम्यान, पत्नी सुमन यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत “पोलिसांत केस केलीस तर जीवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा पो. हवा वारे यांनी नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास आगलावे करीत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…