शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी गट नंबर 1064/1/अ मधील एक एकर क्षेत्र विकत घेतले होते. दिनांक 19 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांनी त्या शेतजमिनीत भेट दिली असता, तेथे लावलेला २० महिन्यांचा उभा ऊस कुणीतरी तोडून चोरी करून नेल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे त्या शेतात नांगरटही करण्यात आलेली होती.
फिर्यादीच्या आरोपानुसार, ही संपूर्ण घटना शेजारील शेतकरी महादेव भगवान लाड, तसेच मूळ जमीनमालक आरूणा नाना काळे व नाना सोनबा काळे (सर्व रा. निमोणे, ता. शिरूर) यांच्या संगनमताने घडवली गेली आहे. या तिघांनी मिळून बेकायदेशीरपणे शेतात प्रवेश करून ऊस चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पो.हवा टेंगले हे करत आहेत. शेतजमिनीतील वादातून वाढलेल्या या प्रकारामुळे निमोणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलीस यावर पुढील तपास करत असून, दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…