शिरूर तालुका

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी समाजातील शंकर माने यांचे कुटुंब काही वर्षांपूर्वी स्थाईक झाले. भटकंती करत फिरत्या पद्धतीने भांडी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाचा गाडा हाकत असताना असताना माने कुटुंबातील तुळजाराम माने ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करु लागला कुटुंबात कोणी शिक्षित नसताना तुळजाराम याने मुलांना चांगले शिक्षण देऊ केली.

तुळजाराम यांचा मुलगा रोहित बारावी नंतर पुढील शिक्षक घेत असताना त्याने गावातील गुरुकुल अभ्यासिका मध्ये अभ्यास करत पोलीस भरतीची तयारी सुरु केली कोरोना नंतर पोलीस भरतीची परीक्षा दिली. मात्र 2 मार्काने अपयश आले. मात्र रोहितने पुढे जिद्दीने अभ्यास करत नुकत्याच झालेल्या परीक्षेत जिद्दीने अभ्यास केला असता नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून रोहित तुळजाराम माने पुणे शहर पोलीस दलात भरती झाला असल्याने माने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून रोहित याने भटक्या समाजातून पोलीस बनत कुटुंबाचे नाव उज्वल केले.

रोहित पोलीस झाल्याचे कळताच पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे, माजी सैनिक जालिंदर सासवडे, उद्योजक जनार्दन दोरगे यांसह आदींनी त्याचा सन्मान केला असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा परिस्थितीवर मात करत पोलीस झाल्याने रोहितच्या यशा बद्दल त्याचे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

परिस्थितीची जाणीव असल्याने जिद्दीने अभ्यास करत होतो, मला वडील तुळजाराम माने, चुलते लक्ष्मन माने व नातेवाईक निखील भिसे यांची मोठी साथ मिळाली असून जिद्द ठेवल्यास काहीही अश्यक्य नाही असे रोहित माने याने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

9 तास ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

9 तास ago

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

2 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

2 दिवस ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून…

2 दिवस ago

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

3 दिवस ago