शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 22 वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने बेपत्ता युवतीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस येथे खबर दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाव्हळ हॉस्पिटल परिसरात राहणारी श्रुती कांबळे या युवतीचे वडील कामाला गेले असताना श्रुतीचा घरात मोबाईल वरून भावासह वाद झाला. त्यानंतर रात्री सर्वजन झोपले असताना सकाळच्या सुमारास श्रुती दिसून आली नाही, त्यामुळे तिचा आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला.
मात्र कोठेही मिळून आली नाही त्यामुळे लक्ष्मण रामनाथ कांबळे (वय ५१) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. परळी वैजनाथ ता. परळी जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून बेपत्ता श्रुतीचे वर्णन रंग सावळा, केस काळे, उंची चार फुट पाच इंच, अंगात गुलाबी टी शर्ट, काळी प्यांट असे असून बेपत्ता युवतीबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ८६००४२०७९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…