शिरूर (अरुणकुमार मोटे): आंबळे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत आणि या शिक्षकांची बदली करून दुसरे शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी आंबळे (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ८) टोकाचे पाऊल उचलत गावातील शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घेऊन थेट शिरूर पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरवली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्याच दिवशी सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंबळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या अनिल वाखारे व सिमा वाखारे या शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजावरून ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या असून, त्याच्याकडून विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण दिले जात असल्याने व त्यामुळे आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी सोमवारी विद्यार्थ्यांसह थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठले. पंचायत समितीतील प्रवेशद्वारातील व्हरांड्यात शाळा भरवूर तेथेच शैक्षणिक परिपाठ सुरु केला होता.
आंबळेचे सरपंच सोमनाथ बेंद्रे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बेंद्रे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिवले, संदीप घुमरे, मच्छिंद्र सिन्नरकर, शेखर निबांळकर, श्रीकांत नि बांळकर, सागर देशमुख, किसन बेंद्रे, सादिक ईना मदार, सीमा बेंद्रे, नीलम सागर, यास्मीन नदाफ यांच्यासह ग्रामस्थ व पालक यावेळी उपस्थित होते. आंबळे शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला असल्याकडे ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपासून पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधून बदलीची मागणी केली केली. मात्र कुठलीही दखल घेतली न गेल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक केंद्रप्रमुखांच्या मिलिभगतमुळे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या शिक्षक बदली व इतर मागण्यांकडे र्दुलक्ष केल्यास जिल्हा परिषद, पुणे येथे शाळा भरवण्याचा इशारा सरपंच बेंद्रे यांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून शाळेत इन्स्पेक्शन झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गटविकास अधिकारी महेश डोके यांनी पालक व ग्रामस्थांशी चर्चा करून आंबळे शाळेसाठी दुसरे दोन शिक्षक दिल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज
शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई
शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार, मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शिक्षक कार्यरतच नसल्याचे उघड…
शिक्षक दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ अन् पुढे…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…