आरोग्य

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

कॉफी हे जगभरातील सगळ्यांचे आवडते पेय आहे. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनेच होते. काहीजणांना तर कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही. सकाळी उठल्यानंतर एक कप गरमागरम कॉफी मिळाली तर दिवस चांगला जातो. इतकंच नाही तर ऑफिसच्या कामात व्यस्त असताना संध्याकाळीही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत कॉफी पिणं अनेकांना आवडत, यामुळे मूड फ्रेश होतो. कॉफी प्यायल्याने आपल्या शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते

जेव्हा कामाचा ताण वाढतो किंवा काम करून कंटाळा येतो तेव्हा पटकन रिफ्रेश होण्यासाठी कॉफीचा एक कप आपण घेतो. ऑफिसमध्येच नाही तर घरी असल्यावर देखील संध्याकाळच्या वेळी थोडं फ्रेश होण्यासाठी कॉफी घेतली जाते. कॉफी प्यायल्याने शरीरात थोडी ऊर्जा येते आणि लोकांना ताजेतवाने वाटते. कॉफी प्यायल्याने थकलेलं, मरगळलेले शरीर पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन पुढच्या कामाला लागते. कॉफी प्यायल्याने काही क्षणांतच फ्रेश वाटते यामुळेच आपण सकाळी सर्वात आधी उठल्यावर कॉफी पितो. त्यानंतर घरी किंवा ऑफिसमध्ये कॉफीची तलप लागल्यावर लगेच कॉफी पितो. परंतु अशी वारंवार कॉफी पिणे आपल्या शरीराला योग्य आहे की अयोग्य? क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी त्यांनी कॉफीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात

कॉफी पिण्याने होते नुकसान…
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, कॉफीमध्ये कॅफीन नावाचा घटक असतो. कॅफीनचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास कॅफीन निश्चितच एकाग्रता वाढवते, पण जर ते जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडू शकतं. जर तुम्हाला जास्त कॉफी पिण्याची सवय लागली असेल तर त्यामुळे तुम्हाला सतत डोकेदुखी होईल. जास्त कॉफी पिण्यामुळे नर्वस सिस्टम खूप जास्त सक्रिय होऊ लागेल ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.

जास्त कॉफी पिण्यामुळे वारंवार लघवी होऊन शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागेल. जर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर कॉफी पित असाल तर त्यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होईल. जर रात्री झोप आली नाही तर दिवसा तुम्हाला फ्रेश वाटणार नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्यावरील स्ट्रेस वाढेल. जास्त कॉफीचा वाईट परिणाम पोटावरही दिसून येतो. जास्त कॉफी प्यायल्याने पोटांच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. ही सर्व कारणे लक्षात घेता कॉफी मर्यादित प्रमाणात पिणे गरजेचे असते.

यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननुसार, एका व्यक्तीने दिवसभरात ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. वास्तविक, ४०० मिलीग्राम कॅफिन हे अंदाजे ४ कप कॉफीच्या समान असते. दिवसभरात चार कपपेक्षा कमी कॉफी प्यावी. काही औषधांसोबत कॉफी पिऊ नये. उदाहरणार्थ, श्वसनाच्या आजारांवर, छातीत जळजळ होत असेल आणि यावर जर तुम्ही औषधे घेत असाल तर आणि सर्दी – खोकल्यावर जर औषधे सुरु असतील तर त्यावर कॉफी पिऊ नये.

(फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या)

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

19 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago