शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात युरिया टंचाई; शेतकरी हवालदिल; अधिकाऱ्यांना मलई…

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. पिकांची उगवण चांगली झाली आहे. पिकांना आवश्यकता असताना युरिया खताचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन खरिपात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर युरियासाठी गावोगाव फिरण्याची वेळ आली आहे.

खरिपाच्या बाजरी, सोयाबीन, मूग अशा पिकांसाठी नत्रयुक्त युरियाची अत्यंत आवश्यकता असते. वेळेत युरिया उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांना शासनाने मुबलक प्रमाणात युरिया खते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कृषी विभाग व शासन खते उपलब्ध असल्याचा कांगावा करतात. मात्र प्रत्यक्ष दुकानांमध्ये युरिया खताचा साठा उपलब्ध होत नाही. अशी प्रतिक्रिया मलठण सोसायटीचे माजी अध्यक्ष नानाभाऊ फुलसुंदर, सविंदणेचे महादू पोखरकर, जयदीप लंघे यांनी दिली.

कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले की, युरिया देणाऱ्या कंपण्या एका दहा टनाच्या युरियाच्या गाडी पाठीमागे तीन ते चार लाख रुपयांचे इतर खते- औषधे घेण्याची सक्ती करतात त्या शिवाय युरिया देत नाहीत. त्यामुळे मोठे भांडवल गुंतवणुक करावी लागते. इतर लिंकिंग केलेले खते न खपल्यास त्याचा बोजा सोसावा लागतो.

शेतकऱ्याला लिकिंग खते घेण्याचा आग्रह केल्यास त्यांचाही खर्च वाढत असल्याने ते घेत नाहीत त्यामुळे कृषी सेवा केंद्रचालक युरिया खत घेत नाहीत.. कंपण्यांनी लिकिंग खते न देता युरिया उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, प्रगतशील शेतकरी कैलास गावडे यांनी केली आहे.

कृषी अधिकारी नक्की करतात तरी काय?
शिरूर तालुका कृषी अधिकारी यांचा कृषी सेवा केंद्रचालकांवर अंकुश राहीला नसून कृषी सेवा दुकानदारांकडून मिळणाऱ्या आर्थिक मलईमुळे ते कुठलीही कारवाई करत नाही. अशी चर्चा बेट भागातील शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांना युरीया उपलब्ध होत नाही मग ते करतात तरी काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

शिरुरच्या बेट भागात टाकळी हाजी येथे दुध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शिवबा संघटनेचा आक्रमक पवित्रा

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल…पोलिसांपुढे मोठे आव्हान

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये रात्रीस चाले ‘ड्रोनचा खेळ’; नागरिकांमध्ये भिती…

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

शिरूर तालुक्यातील बेट भागात सलग तीन दिवस पाऊस…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

17 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

22 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

24 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

1 दिवस ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 दिवस ago