शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेला वारंवार फोन करुन फोनवर विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाबू मंडलिक व प्रवीण मंडलिक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेच्या हॉटेल वर जेवण करण्यासाठी येत असल्याने बाबू व प्रवीण यांची महिलेशी ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी दोन्ही युवक हॉटेल मध्ये येण्याचे बंद झाले मात्र 23 मार्च रोजी दोघा युवकांनी त्यांच्या मोबाईल वरून महिलेला वारंवार फोन करुन महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत महिलेशी अश्लील शब्दात बोलत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
याबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी बाबू मंडलिक व प्रवीण मंडलिक दोघे रा. जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे या दोघांवर विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उज्वला गायकवाड करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…