शिरूर तालुका

शिरुरच्या ऋतुजा ठुबेची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी

शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान सुरु असलेल्या ६५ वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट एअर रायफल या प्रकारात ऋतुजा बाबासाहेब ठुबे हिने उत्कृष्ट कामगिरी करत मे २०२३ मध्ये होणाऱ्या ऑल इंडिया कुमार सुरेंदर सिंग शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

ऋतुजा ठुबे हिचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील बाबुर्डी असुन ती शिरुर येथील सी टी बोरा महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिक्षण घेत आहे. ऋतुजा हिची आई मजुरीचे काम करुन तिला या खेळासाठी प्रोत्साहित करत असते. शिरुर मधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब मध्ये ती प्रशिक्षक शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिच्या या यशाबद्दल बाबुर्डी गावच्या ग्रामस्थांनी ऋतुजाचे अभिनंदन करत आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच ठाणे शहर पोलिस उपायुक्त गणेश गावडे, शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, नगरसेवक नितिन पाचर्णे शिवसेना ठाकरे गटाचे शिरुर-आंबेगाव तालुका प्रमुख गणेश जामदार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे, भाजपा पारनेर तालुका उपाध्यक्ष काशिनाथ नवले, गजानन गावडे यांनीही ऋतुजा ठुबे हिचे अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

8 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago