शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील तरुण तडफदार युवक मच्छिंद्र कदम यांची शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. या निवडीप्रसंगी माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रीय सदस्य कार्यकारणी सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील विविध विकास कामांमध्ये मच्छिंद्र कदम यांनी भरीव योगदान दिले असून तरुणांना एकत्रित करीत गोरगरिबांना नेहमीच विविध अडीअडचणीप्रसंगी त्यांनी सहकार्य केलेले आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर तालुक्यासह जिल्हयातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हयासह तालुकाभर तरुणांची फौज एकत्र घेत शाखांचा विस्तार करणार असून पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर विकासकामाच्या माध्यमातून गावागावांचा विकास करणार आहे.
मच्छिंद्र कदम (नवनिर्वाचित शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…