न्हावरे (तेजस फडके) शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच शारीरिक सुदृढता व चपळता येण्यासाठी खेळांमध्ये सहभागी व्हावे. शिक्षण घेत असताना शिक्षकांकडुन आपल्यावर जे संस्कार होत असतात त्यांचा उपयोग आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी होत असतो. त्यामुळे शिक्षकांच्या सुचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे व प्रामाणिकपणे अभ्यास करावा असे आवाहन ऊर्जा उद्योगसमुहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी केले.
मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत आयोजित समारंभात ते बोलत होते. आंधळगाव (ता. शिरुर) येथील ऊर्जा उद्योगसमुहाच्या वतीने मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील खेळाडूंसाठी पन्नास गणवेशांचे वितरण करण्यात आले. ऊर्जा उद्योग समुहाचे अध्यक्ष व विद्याधाम प्रशालाचे माजी विद्यार्थी प्रकाश कुतवळ यांच्या हस्ते या गणवेशांचे वितरण करण्यात आले. यापुढेही प्रशालेला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्याध्यापक रामदास चव्हाण, उपमुख्याध्यापक गणपत बोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पर्यवेक्षिका संपदा वेताळ, रामदास फराटे, मिलिंद निंबाळकर, क्रीडा अध्यापक बी. पी. येवले, प्रशांत वाळुंज, राजेंद्र कांबळे, विजय कराळे, नितीन गवळी, संजय पारखे, हर्षल शेंडे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष परदेशी यांनी तर आभार संपदा वेताळ यांनी मानले.
शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व
मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम योगासन स्पर्धेत घवघवीत यश
शिरुर; साधना खोमणे यांचा पुणे जिल्ह्यातील शिक्षकांकडून सत्कार
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…