शिरुर (अरुणकुमार मोटे) जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या महासभेच्या सदस्यपदी साधना अरुण खोमणे यांची निवड करण्यात आली हि शिक्षकांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असुन खोमणे या एक उच्च शिक्षित असुन त्यांना शिक्षकांच्या प्रश्नाचीही उत्तम जाणं आहे. तसेच त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनिता गावडे यांनी सन्मान सोहळ्यात बोलताना केले.
पुणे जिल्ह्याला देशाच्या महासभेत हि प्रथमच संधी मिळाली असुन अखिल संघाच्या दृष्टीने हे सुद्धा गौरवास्पद आहे असे शिक्षक नेते शिवाजीराव वाळके यांनी सांगितले. त्यांच्या या राष्ट्रीय पातळीवरील निवडीसाठी पुणे जिल्हा अखिल प्राथमिक शिक्षक संघ यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यांचा जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षकांनी मला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली या संधीचे सोने करण्यासाठी व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील राहील असे साधना खोमणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल पुणे जिल्हा प्राथमिक संघाचे नेते शिवाजीराव वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, शिरुर नगरीच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, मुख्याध्यापक रभाजी खोमणे, डॉ. मनिषा चोरे, सोनल हिलाळ, दिग्दर्शक अजित शिरोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष मोहरे, सरचिटणीस सुरेश थोरात, तालुका अध्यक्ष अशोक पठारे, अशोक कर्डीले, कल्याण कोकाटे, शर्मिला निचीत, राजश्री मोटे, प्राजक्ता मुळे, शीतल जोरी, अर्जुन निचित, चंद्रकांत दंडवते, रमेश थोरात, संदीप थोरात, सुभाष कोरडे, अरुण गांजे, किसन शिंदे, धनंजय जाधव, सखाराम गावडे, नवनाथ निचीत, संतोष रनसिंग, बाळासाहेब निर्वळ तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन निचीत यांनी तर आभार राज्याचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी मानले.
कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या
शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक