शिरूर तालुका

शिक्रापूरच्या श्री क्लासेसमधील विद्यार्थ्यांचे विविध परीक्षेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत यश संपादित केले असून नुकतेच सदर विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री क्लासेस मध्ये पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचे स्वतंत्र शिक्षण देण्यात येत असताना संचालिका पूजा ढेकणे या विशेष परिश्रम घेत असताना सदर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी इशित वाव्हळ, आर्यन तक्ते, सिद्धार्थ कांबळे यांची ज्ञान प्रबोधिनी साठी निवड झाली, तर पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्क संकपाळ, अथर्व ठाणगे, श्लोक भापकर यांनी तसेच मंथन परीक्षेत प्रेम जगताप, निशित वाव्हळ, शंतनू लांडगे या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.

सदर क्लास मध्ये शिक्षण घेणाऱ्या इशित वाव्हळ, हर्ष गावडे, श्रेयांस पाटील या विद्यार्थांनी एन. एस. एस. ई या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यश संपादित केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मानचिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी यावेळी डॉ. संदीप वाव्हळ, डॉ. धनंजय लोंढे, डॉ. स्वप्नाली लोंढे, आदर्श पोलीस हवालदार अनिल जगताप, शिष्यवृत्ती मार्गदर्शक विजय गोडसे, गोरख काळे, ज्ञानेश्वर भापकर, मोनिका जगताप यांसह आदी उपस्थित होते. यावेळी श्री क्लासेसच्या संचालिका पूजा ढेकणे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

4 तास ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

6 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

9 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

11 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

11 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

11 तास ago