शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे (दि. 25) रोजी पुणे नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, युवासेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, अमोल हरगुडे, वैभव ढोकले, महिला आघाडी तालुका प्रमुख चेतना ढमढेरे, वंदना ढमढेरे, उपतालुका प्रमुख नितीन दरेकर, नानाभाऊ गिलबिले, नितीन मुळे, राहुल शिंदे, संतोष भोंडवे, अनिल पवार, सुनील जाधव, सुजित विरोळे, आकाश सुर्वे, स्वप्नील रेड्डी, उत्तम कान्हूरकर, बाळासाहेब दाते, अतुल विश्वासे, विकास नरके, सत्यवान हरगुडे, अनिल सातकर, संतोष झरे, अक्षय पवार, राहुल रणधीर यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद व हिंदुस्तान जिंदाबाद यांसह आदी घोषणा देत आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, युवासेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, महिला आघाडी तालुका प्रमुख चेतना ढमढेरे यांनी तीव्र शब्दात मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना पीएफ आय संघटनेने खुलेआम घोषणा दिल्या असून खुलेआम अशा घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार यांनी दिला आहे. यावेळी शिवसैनिकांच्या मागण्यांचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांना देण्यात आले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…