बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे.
राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर मुलगा तूकापा हळूर (वय 24) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ‘मालप्पा हळूर यांची रबकवी बनहट्टी शहरात दोन गुंठे जमीन आहे. मालपाच्या मुलाने म्हणजेच तुकाप्पाने त्यातील एक गुंठा जमीन आश्रम घर बांधण्यासाठी देण्यात यावी अशी वारंवार मागणी करत होता. मात्र या मागणीला वडिलांनी दुजोरा न दिल्याने याचाच राग डोक्यात ठेवून तुकाप्पाने काल शुक्रवारी (दि. 23) रोजी दुपारी शेडमध्ये झोपलेल्या मालपाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच रबकवी बनहट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येप्रकरणी संशयित तुकप्पा हळूर याला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबकवी बनहट्टी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…