शिरूर तालुका

शिक्रापूरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन काही रक्कम जप्त करुन शालिक प्रेमदास कुलकर्णी याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी एका पत्र्याचे शेड मध्ये एक युवक कल्याण मटका नावाने मटका चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक शिवाजी चितारे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता एक युवक व्यक्ती कागदावर आकडे लिहून देत कल्याण मटका नावाचा मटका चालवत असल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी त्यांना जागेवर पकडून त्याच्याजवळील मटक्याचे साहित्य व काही रक्कम जप्त करत त्याला ताब्यात घेतले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिवाजी युवराज चितारे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शालिक प्रेमदास कुलकर्णी (वय ३०) रा. पाटवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago