शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील सासरवाडीत आलेल्या व्यक्तीला दोघा युवकांनी हॉकी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव रामदास शिंदे व शुभम प्रभाकर शिंदे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राशीन ता. कर्जत येथील अंबादास साळवे यांची पत्नी शीतल साळवे हि तिच्या आईच्या घरी माहेरी येऊन राहत असल्याने अंबादास हे सदर ठिकाणी आपल्या पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आले होते. २० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अंबादास हे जेवण करत असताना त्यांची पत्नी शीतल हिच्या मामाची मुले वैभव शिंदे व शुभम शिंदे येथे आले. त्यांनी अंबादास यांना दमदाटी करत हॉकी व लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले.
घडलेल्या प्रकाराबाबत अंबादास पंडित साळवे (वय ४२) रा. जानभरे वस्ती राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी वैभव रामदास शिंदे व शुभम प्रभाकर शिंदे दोघे रा. वाजेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…