शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर येथील एका घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व एक मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर येथे राहणारे शाहिद शेख हे त्यांच्या कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना 20 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घरात कोणीतरी असल्याचे शाहीद यांच्या पत्नीला जाणवले. त्यामुले त्यांनी आवाज दिला असता घरातून 1 अज्ञात युवक बाहेर पळून गेला. त्यावेळी शहीद यांनी पाहिले असता घरातील कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यामुळे कपाटाची पाहणी केली असता कपाटातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व 1 मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत शाहीद सुबान शेख (वय २४) रा. महाबळेश्वर नगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…