क्राईम

शिरुर तालुक्यात तलवार घेऊन दहशत करणारा पोलिसांच्या ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल जवळ हातात तलवार घेऊन शिवीगाळ करत दहशत करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली असून संदेश बाळासाहेब जाधव असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल जवळ एक व्यक्ती हातात धारदार तलवार घेऊन फिरत नागरिकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली त्यांनतर पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, पोलीस नाईक विकास पाटील, पोलीस शिपाई किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता संदेश जाधव हा हातात धारदार तलवार घेऊन आरडाओरडा करत शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी त्याला जागेवर पकडून त्याच्याजवळील तलवार जप्त करत संदेश जाधव याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस शिपाई किशोर उत्तम शिवणकर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संदेश बाळासाहेब जाधव (वय ३९) रा. नरके आळी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

9 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago