केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात.
केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते
कढीपत्त्याच्या पानांमध्ये ए, बी, सी, ई व्हिटामीन्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कढीपत्त्यातील व्हिटामीन सी, कोलाजन प्रोडक्शन वाढवते. ज्यामुळे केस सरळ राहण्यास मदत होते. कढीपत्त्यात एंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सचे डॅमेज रोखता येते. कढीपत्त्याच्या सेवनानं केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. ज्यामुळे स्काल्पचा ड्रायनेस कमी होतो आणि नवीन केसांची वाढ होते.
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कढीपत्त्याची ४ ते ५ पानं घ्यावी लागतील. त्याव्यतिरिक्त २ चमचे तूप, एक चमचा चणा डाळ, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, ५ ते ६ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे मोहोरीच दाणे, २ चमचे जीरं आणि गरजेनुसार मिठाची आवश्यकता असेल. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तूप गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या.
नंतर यात चण्याची डाळ घाला मग मोहोरीचे दाणे, मिरची घालून शिजवा. नंतर सर्व मसाले घालून तसंच कढीपत्त्याची पानं ब्लेडरमध्ये घालून पावडर बनवून घ्या. आहारतज्ज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तेव्हा दह्यात मिसळून खाऊ शकता. केसांबरोबरच आरोग्यालाही याचे फायदे मिळतात. ही चटणी खाल्ल्यानं केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…