क्राईम

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

परिसरात खळबळ, आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात

पुणे (वाघोली): वाघोली परिसरातील बायफ रोडजवळील ऑलिव्ह सोसायटीलगत असलेल्या गल्लीत मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. आईनेच आपल्या ११ वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण हत्या केली असून, त्यानंतर १३ वर्षीय मुलीवरही प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र मुलगी जोरात ओरडत घराबाहेर पळाल्याने तिचा जीव वाचला. सध्या जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेत साईराज संतोष जायभाय (वय ११) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर धनश्री संतोष जायभाय (वय १३) ही आईच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. आरोपी महिलेचं नाव सोनी संतोष जायभाय असून ती मूळची कंधार, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे. सध्या ती वाघोलीतील बायफ रोड परिसरात वास्तव्यास होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. मुलाचा गळा चिरल्यानंतर घरातील खोलीत मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. घटनास्थळी आरोपी आई हात-पाय रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. जखमी मुलीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य काही कारण आहे का, याचा शोध घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.वाघोली परिसरात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago